समलैंगिकतेसंदर्भात कायदा काय आहे?
भारतीय दंडसहिता कलम ३७७ नुसार समलिंगी संबंधांना तर मान्यता नाहीच; पण मुखमैथुन, गुदमैथुन त्याचप्रमाणे हस्तमैथुन करणे याला कायद्याची मान्यता नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. अशा प्रकारे संबंध करणार्या व्यक्तींना जन्मठेप अथवा काही वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. या कायद्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या समान अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य या कलमांचे उल्लंघन होते, असा आग्रह धरून या कायद्यात कालोचित बदल करण्याच्या मागणीसाठी काही सामाजिक संस्थांनी मिळून हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे. समलैंगिक संबंध असणार्या आणि ज्यांचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी समलिंगी आहेत अशा व्यक्तींनी लक्षात घ्यावेत, असे काही मुद्दे - - समलैंगिकतेसंदर्भात शारीरिक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक पैलूंचा विचार करणे महत्त्वाचे आहे. समलिंगी व्यक्तीला त्याच्या स्वप्रतिमेबद्दल हजारो प्रश्न निर्माण होतात. आपण जसे आहोत तसे स्