मनात उत्सुकता आणि तोंडाला कुलूप !
समलिंगी संबंध या विषयावरील मूलभूत प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे ! स्त्री-पुरुष शारीरसंबंधांसंदर्भात मानवी जगण्याच्या अवस्था कोणत्या? स्त्री-पुरुष शारीरसंबंधांसंदर्भात मानवी जगण्याच्या चार अवस्था निसर्गाला अभिप्रेत आहेत. १) ऑटो सेक्शुअल, २) होमो सेक्शुअल, ३) हेट्रो सेक्शुअल, ४) नो सेक्शुअल कोणताही मानव प्राणी (स्त्री-पुरुष) या चार अवस्थांतूनच जावा, अशी निसर्गाची अपेक्षा असते; पण सगळीच माणसं एका अवस्थेतून दुसर्या अवस्थेत जात नाही. काही पहिल्याच अवस्थेत अडकून पडतात, तर काही दुसर्या, तर काही थेट चौथ्या अवस्थेतच जन्माला येतात. १) ऑटो सेक्शुअल (वय वर्ष 0 ते ७) जन्माला आल्यापासून सात वर्षांपर्यंत मनुष्यप्राणी साधारण याच अवस्थेत जगतो. स्वतच्या वाढीसाठी, आनंदासाठी या वयात ते मूल फक्त घेत असतं, त्याला प्रेमबिम काही कळत नाही. ‘घेणे’ हाच त्याचा या काळातला धर्म ! २) होमो सेक्शुअल (वय वर्ष ७ ते १४) आ